मी लिहतो कविता - कविता

 

मी लिहतो कविता

 

मी लिहतो कविता

मीच वाचत बसतो

माझ्याच कवितेवर मीच हासत असतो

 

सारखं सारखं वाचून

चुका काढतो वेचून

करतो मग कविता शब्दांनी ठेचून ठेचून

 

ठेचलेले शब्द जणू मिरचीचा ठेचा

लागी नुसते तिखट

होई जाळ अकलेचा

 

जळालेली अक्कल मग

कवितेत रमत नाही

अन म्हणते कवीला कविता जमत नाही !

Comments