पावसाचे चित्र - कविता

पावसाचे चित्र

 

आठवणीत आहे अजून ती रात्र

रंगवीत होतो मी पावसाचे चित्र

 

त्या रात्री पाऊस जणू रूसला होता

खिडकीतून पाहताना थोडासाच दिसला होता

 

रंगविलेले चित्र त्याचे दावले मी ढगांना

पावसाचे ते चित्र पाहून ढग जोरात हसले

 

अन त्या रात्री ढग खूप खूप बरसले

अन त्या रात्री ढग खूप खूप बरसले


Support JuniorWriter by purchasing eBook - Click Here

Comments