पोर्णिमेचा
पाऊस
पोर्णिमेच्या
रात्री नभ आले दाटून, एकमेकास खेटून
काळ्याभोर
ढगांनी गेले आकाश झाकून
वाटेवरुन
चालताना मी शोधत होतो प्रकाश
चंद्ररूपी
दिवा जणू विजलाच होता आज
दाटलेल्या
ढगांचे झाले मोठे भांडण
कडाडणार्या
वीजांनी उजळून गेलं पटांगण
शांत
करण्या ढगांस मग मी गायली पाऊस गाणी
गाणी भेसूर
ऐकूनही ढगांच्या डोळ्यात आलं पाणी !
Support JuniorWriter by purchasing eBook - Click Here
Comments
Post a Comment