ट्रेलरच्या सुरुवातीला एक निळसर रानगवा किंवा बुल रणबीरच्या अंगावर येतोय आणि रणबीर त्याला बुक्की मारून थांबवताना दिसतो. लगेच अमिताभ यांच्या आवाजात डायलॉग आहे, "प्राचीन काल से हमारे बिच कुछ ऐसी शक्तीया है जो अस्त्रो मे भरी हुई है. ये कहाणी है उन सारे अस्त्रो के देवता की, ब्रह्मास्त्र की. और एक ऐसे नोजवान की जो इस बात से अंजान है की वो इस अस्त्र की किस्मत का सिकंदर है. शिवा"
यावरून हे कळते की काही शक्ती असलेली अस्त्र या पृथ्वीवर प्राचीन काळापासून आहेत. आणि ही त्या सगळ्या अस्त्राच्याच्या देवतेची म्हणजे सगळ्यात मोठ्या ' ब्रम्हस्त्राची' कहाणी आहे. रणबीर कडे त्या अस्त्राला चालवण्याची शक्ती आहे पण ती त्याला माहित नाही. त्यानंतर आलिया आणि रणबीरची प्रेमकथा दाखवली जात आहे. ते एका नावेवर थांबले आहेत आणि रणबीर च्या हाताला पाण्यातून येणारी आग लागते. तो हात झटकतो आणि आग पाण्यात जाते. आलिया काळजी पोटी हात जळला तर नाही ना हे पाहते. हाताला काहीच झालेलं नसतं. मग रणबीर तिला सांगतो की आगीने तो जळत नाही. त्याचं आगीशी काहीतरी नातं आहे. तो तिला हेही सांगतो की या जगात काहीतरी सिक्रेट घडामोडी चालू आहेत. अनेक अस्त्र आहेत ज्यांचे रक्षकही आहेत. परंतू एक काळी शक्ती सुद्धा आहे जी सगळं भस्म करेल. आता मौनी रॉयची एन्ट्री होते आणि ती डायलॉग मारते, "हमारा एक ही लक्ष्य, ब्रह्मास्त्र"
पुढे अमिताभ रणबीर ला सांगतोय की रणबीर हा अस्त्रांच्या दुनियेशी जोडलेला आहे कारण तो स्वतःच अग्नी अस्त्र आहे. त्यानंतर नागार्जुन शिवाच्या पिंडिसमोर उभारून जमिनीवर बुक्की मारतोय. नागार्जुन हा पाणी अस्त्र आहे बहुतेक. मग आलिया अन् रणबीर ची दृश्य आहेत. रणबीर हातात गदा घेऊन ती जमिनीवर आपटताना दिसतोय. शेवटी कोणीतरी फिट बॉडी असलेला व्यक्ती हातात त्रिशूळ घेऊन उभा असलेला दिसतो. हा व्यक्ती बहुतेक शाहरुख असेल असे वाटते.
ट्रेलर मधील या सगळ्या सिन मध्ये पिवळ्या निळ्या लाल अशा विविध रंगाच्या ज्वाला VFX चा वापर करून भरपूर प्रमाणात दाखवलेल्या आहेत. म्हणजे यावरच जास्त भर देण्यात आलेला दिसतोय. एक अस्त्र आणि त्याला नष्ट करायला निघालेली एक चेटकीण, त्या अस्त्राला तिच्या हाती जाण्यापासून वाचवणारे इतर रक्षक अशी ही सरळ गोष्ट आहे. रणबीरला काही माहीत नाही आणि त्याला अमिताभ मार्गदर्शन करत आहेत. मग रणबीरला हळू हळू आपल्यातील शक्तीची कशी जाणीव होते आणि तो कसा सगळ्यात पुढे होऊन चेटकीण सोबत दोन हात करतो हेच या चित्रपटात दाखवले असणार. सोबत आलिया रणबीर च्या प्रेमाची ताकद कशी या सगळ्यात मदत करते असाही काही मुलामा कहाणीला दिलेला आहे बहुतेक.
अनेक मोठे अभिनेते व अभिनेत्री, तंत्रज्ञानाचा चांगला वापर, बॉलिवूड मध्ये पहिल्यांदा असा काही भव्य चित्रपट बनत आहे या सगळ्या कारणांमुळे हा चित्रपट भरपूर कमाई करण्याची शक्यता आहे. असे असले तरी 300 करोड बजेट असलेला हा चित्रपट 300 करोडचा आकडा पार करेल का यात शंकेला वाव आहे. संपूर्ण चित्रपट फक्त VFX च्या जोरावर बनवलेला असेल आणि कथा मात्र साधारण असेल तर मग 300 चा आकडा गाठणे अवघड काम आहे. तशी कथा फार काही सस्पेन्स असलेली दिसत नाही ट्रेलर पाहून. पण ही कथा चांगल्या प्रकारे दाखवली असेल तर 300 चा आकडा सहज पार होऊ शकतो. 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एकदा पाहण्यास काही हरकत वाटत नाही.
मी या ट्रेलरला 5 पैकी ⭐⭐⭐✨ साडेतीन स्टार देत आहे.
Bramhastra Movie Trailer Review, Ranbir Kapoor, Aliya Bhatt, Abitabh Bachchan, Nagarjuna Akkineni, Mouni Roy
Bramhastra Movie Release Date : 9 September 2022
Comments
Post a Comment