ट्रेलर च्या सुरुवातीला "बचपन से इंतजार कर रही हु तूम्हारे साथ शादी की, लेकीन तुम्हे तुम्हारी बहनो के सामने कुछ दिखता ही नहीं. बताओ बारात कब ले आओगे मेरे घर?" असा डायलॉग म्हणत भूमी पेडणेकर रडक्या आवाजात अक्षय समोर तक्रार करताना दिसते.
त्यावर अक्षय "जैसे ही बहनो की शादी होजायेगी मे ले आऊंगा" हा डायलॉग बोलत तिची समजूत काढताना दिसत आहे. नंतर भूमी "इनकी शादी?" असा प्रश्न अशा प्रकारे विचारत आहे जणू अक्षय च्या बहिणींचे लग्न होणे म्हणजे अशक्य गोष्ट ! नंतर लगेच अक्षयच्या चार बहिणी आपसात भांडताना व दंगा मस्ती करताना दिसत आहेत. अक्षय एका दुकानात बसून गोलगप्पा खाणाऱ्या ग्राहकाशी टोमणा मारत बोलत आहे.
पुढच्या सिनमध्ये भूमीचे वडील अक्षयने आपल्या आईला आधी बहिणींचे लग्न करणार असे वचन का दिले याबद्दल त्याच्यावर ओरडताना दिसतात. अक्षय आपल्या बहिणींचे लग्न व्हावे म्हणून marriage bureau मध्ये जाऊन बसलेला दिसतो. लग्नासाठी tiktok वाला मुलगा पसंत करताना दिसतो. नंतर भूमी चे वडील त्याला सहा महिन्याचा वेळ देऊन warning देतात की त्याने जर सहा महिन्याच्या आत आपल्या बहिणींचे लग्न नाही केले तर भूमीचे लग्न त्याच्या सोबत लावणार नाही.
पुढे हुंडा कसा वाईट आणि त्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक भाऊ कसा पैसे जमावण्यासाठी मेहनत करत असतो हे डायलॉग अक्षय कडून बोलले जात आहेत. तो सिलिंडर च्या गाडीवर काम करताना दिसतो. नंतर अक्षयच्या आईच्या आवाजात डायलॉग आहेत की तिचे नशीबच फुटके आहे. आणि मग अक्षय सुद्धा देव सगळं चांगलं करेल हे सांगून बहिणीला समजावताना दिसतो. आणि मग बहिणीच्या लग्नात नाचताना दिसतो, सोबत भूमी सुद्धा नाचताना दिसते. आणि मग सगळी मुख्य पात्रांची खऱ्या नावासकट स्क्रीन वर ओळख करून दिली जात आहे. पुढे अक्षय भूमीच्या मागे धावताना दिसत आहे. शेवटी एका बहिणीच्या लग्नात बहीण त्याला विचारते की एवढे पैसे कुठून आणले? त्यावर तो दुकान गहाण ठेवल्याचे सांगतो. मग बाकी तिघिंच्या लग्नासाठी कुठून पैसे आणणार असा प्रश्न ती बहीण करते तेव्हा "किडनी बेच दुंगा" असा डायलॉग मारत अक्षय जोक करतो. आणि ट्रेलर संपतो.
आनंद राय यांचा हा चित्रपट उत्तर प्रदेशातील बनारस वाराणसी या भागात शूट झालेला आहे हे जाणवते. यापूर्वी त्यांचे सिनेमे याच भागात शूट झालेले दिसून येतात. ट्रेलर वरूनच सिनेमाची कहाणी काय ते कळले असेलच तुम्हाला. साधी गोष्ट आहे जिला भावाचा त्याग कसा असतो याचा टच दिलेला आहे. आणि भावाचा त्याग व हुंडा या दोन गोष्टीच चित्रपटात फोकस केलेल्या दिसतात. सोबत कॉमेडी करण्याचा प्रयत्न आहे. इतर सर्व पात्र ठीक वाटत आहेत. अक्षय व भूमीची जोडी चांगली आहे. एकदा नक्की पाहावा असा हा फॅमिली चित्रपट वाटतोय. तनु वेड्स मनु सारखी जादू तर हा चित्रपट निर्माण नाही करू शकणार पण हा चित्रपट भरपूर कमाई करू शकतो.
मी या ट्रेलरला 5 पैकी ⭐⭐⭐✨ (3.5) स्टार देत आहे. हा चित्रपट 150 ते 200 करोड कमाई करू शकतो.
अक्षय चांगली कॉमेडी करतो हे आपण अनेक चित्रपटात पाहिले आहे. पण संपूर्ण चित्रपटात मुद्दामहून कॉमेडी करायचा प्रयत्न जर केला असेल आणि ओव्हर अक्टिंग केली असेल तर मात्र हा चित्रपट आपटू शकतो.
Comments
Post a Comment