दिवाळी - कविता


दिवाळी

 

उत्सवात उत्सव भारी दिवाळीचा

चिवडा लाडू अन फराळीचा

शेव अन शंकरपाळी असते चवदार

दुधासांगे खावी करंजी नक्षीदार

 

नको नको म्हणत पहाटे उठणं

अंगभर लावणं सुगंधी उटणं

अंघोळी साठी लागते सगळ्यांची ओळ

थंडीत झोप घालवते गरम पाण्याची आंघोळ

 

आंगणामध्ये दिवे लावून रांगोळी काढणं

नवे नवे कपडे घालून फटाके फोडणं

चोहीकडे चमकतात आकाशी कंदीलं

दारावरच्या माळांमध्ये शोभून दिसतात फुलं

 

दिवाळीच्या सणाला आनंद नांदतो घरोघरी

सार्‍या जगात नाही असा उत्सव हा लय भारी !

Comments