बाग
बागेमध्ये
एके दिवशी जावू चला
छान छान
फुलांसंगे राहू चला
रंगीबेरंगी
फुलांवरती येईल रंगीत फुलपाखरू
पंखावरची
नक्षी त्याच्या पाहू चला
खेळून
खेळून दमल्यावर आपण सगळे जेवू
एकमेकांच्या
डब्यातले दोन-दोन घास खाऊ
बागेमध्ये
कारंजे पाहू चला
कारंजाच्या
पाण्याखाली न्हावू चला
दुपारच्या
वेळी जेव्हा पडेल कडक ऊन
झाडाखालच्या
सावलीत सगळे बसू लपून
मऊ मऊ
गवताची गादी करू चला
निवांत
बसून त्यावर गप्पा मारू चला
बागेमध्ये
एके दिवशी जावू चला
छान छान फुलांसंगे राहू
चला
Support JuniorWriter by purchasing eBook - Click Here
Comments
Post a Comment