स्वप्नांचा बिझनेस


ही आहे एका तरुण क्रिकेट प्रेमीची गोष्ट-


कसे काय चाललेय क्रिकेट प्रमिंनो? तुमची टीम जिंकली की नाही कधी १ करोड चे बक्षीस? नसेल जिंकली तर काही हरकत नाही जिंकेल पुढच्या मॅच ला...अशीच माझीही समजूत होती...आणि मीपण कित्येक टीमा लावल्या..पैसे यायचे आणि परत त्याच्या टिमा लावल्या की जायचे ही ! आणि गेलेच...मग वाटलं आपण संभाव्यता काढू की नेमक्या किती टीमा बनू शकतात आणि कशा कशा....मग काय आपण तो अभितक इसमे एक्स्पर्ट होगया था... उघडलं एक्सेल आणि काढली संभाव्यता... आता तिथं पाच लाखापेक्षा जास्त टीमची संभाव्यता आली... एवढ्या पाच लाख टीमा लावणे शक्य आहे काय? नाहीच...त्यात पुन्हा बेक्कार वाटणाऱ्या प्लेअर ला वगळून फिल्टर मारले...बराच अभ्यास केला..फिल्टर मारत मारत शेवटी १२१ टीमावर संख्या आली... आता वाटू लागलं.. बस्स...आता आपणच जिंकणार...! मग काय..? केली १० पोरं गोळा अन् त्यांनाही स्वप्नं दाखवली अन् लावल्या टीमा....काय सांगू राव... सगळ्या टीमा तळाला...! ती पोरं परत फिरकली सुध्दा नाहीत....एक दिवस या सगळ्याचा विचार करता करता लक्षात आलं की टीम पहिल्या नंबर ला येऊ शकते... जेवढ्या टीमा जास्त व जेवढा काँटेस्ट लहान तेवढे जिंकण्याचे चान्स जास्त....आणि प्रत्येक वेळी टीम बदलण्याची चूक करत होतो...रोहित शर्मा कॅप्टन असेल आणि त्या सिरीज मध्ये मी त्याला सर्व मॅच मध्ये कॅप्टन ठेवले तर एका तरी मॅच मध्ये तो खेळेलच... याउलट प्रत्येक वेळी कॅप्टन बदलला तर जिंकण्याचे चान्स अजुन कमी होतात... आजुन बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या पण आता टिमा लावायला पोरं गोळा होत नाहीत...असो. या सगळ्यात आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हा बिझनेस...मला सांगा ड्रीम ११ ने काय केले? फक्त एक ऍप बनवले व त्याची जाहिरात केली...मग आपण तिथे जाऊन काँटेस्ट मध्ये सहभागी होऊ लागलो...तुम्ही पहा..१००० चा काँटेस्ट असेल व त्यात १०० लोकं एन्ट्री करू शकत असतील तर प्रत्येकाला १० रू एन्ट्री फी असायला हवी ना? पण तसे नसते..ती ११ ते १२ रुपये असते. म्हणजे काहीच न करता सरळ सरळ दहा टक्के प्रॉफिट...आता समजा अशाच काँटेस्ट मध्ये पहिले बक्षीस १०,००० पेक्षा जास्त असेल तर ते जिंकणाऱ्याला ३० टक्के टॅक्स सरकारला द्यावा लागतो. म्हणजे तुमच्या हातात ७ हजारच येतात. तुम्ही पाहिले असेल की एका एका मॅच ला सर्व काँटेस्ट मिळून १०० कोटीच्या वर पैसे जमा होतात. म्हणजे यावर दहा टक्के प्रमाणे पकडले तर ड्रीम ११ ला १० कोटी प्रॉफिट एका दिवसात..एका मॅच ला...आणि सरकारला उरलेल्या नव्वद कोटींवर ३० टक्के म्हणजे २७ कोटी प्रॉफिट...मला सांगा हा पैसा कुणाचा? आपल्यासारख्या अनेक लोकांचाच....याला म्हणतात स्वप्ने विकणे...होय... एका दिवसात श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून चालवलेला बिझनेस... काहींची पूर्ण होतात पण एक सत्य आपण विसरतो की त्या एकाचे स्वप्न पूर्ण झाले कारण इतर हजारोंची स्वप्ने त्या मॅच मध्ये चकनाचुर झाली... जेव्हा हे असले ऍप नव्हते तेव्हा तुमचे पैसे तुमच्याकडे होते..मग हे ऍप काढून तुम्हाला स्वप्न दाखवली व तुम्ही व मी त्याचे तिकीट फाडले...हे म्हणजे आपण सरळ सरळ काही कोटी रुपये सरकारला अन् अशा ऍप चालवनाऱ्याना दान देतो...हेच पैसे तुम्हाला मदत म्हणून मी मागितले तर तुम्ही देणार नाही..पण अशी स्वप्ने दाखवली की तुम्ही तुमची तिजोरी खाली करायला ही कमी करत नाही... हा असा पैसा लुटला जातो... डोकं वापरून आपल्याला हा खेळ थांबवायचा आहे अन् संपत्तीचे समान वितरण करणारी व्यवस्था बनवायची आहे... त्यासाठी गरज आहे एकत्र येण्याची...


तुम्ही पाहिले असेल आजकाल प्रत्येक क्रिकेटर असले ऍप काढून बसलाय कारण फुकटची कमाई है भाई... तुम्ही हेही पाहिले असेल की जे पत्ते खेळण्याला आपण जुगार म्हणतो तोच आता रमि सर्कल वगैरे च्या नावाने ऑफीशियली ऑनलाईन खेळला जातो... याला सरकार ही मान्यता देऊन बसलय... कारण फुकट ३० टक्के हिस्सा कुणाला नको वाटेल..? कधी कधी मला तर वाटते आपण युवक बेरोजगार आहोत हे जाणवू नये, सरकार आपल्यासाठी काही करू शकत नाही हे लपण्यासाठी असले प्लॅटफॉर्म गेल्या काही वर्षात मुद्दाम तयार केले असावेत..... कारण आपण मग आपल्या भाग्याला/नशिबाला दोष देणार व सरकार सेफ सुटणार... आणि नकळत लुटणार पण.... कदाचित असे नसेलही पण काही नेम नाही हे राजकारणी चतुर काय काय करतील...तरुण पिढीला त्यात अडकवून ठेवायचा हा प्लॅन वाटत नाही का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत... तुम्हीही निरीक्षण करत चला... सगळे सामान्य माणसाला लुटायला बसलेत, त्याच्यावर राज्य करायला बसलेत... तुम्हाला जागरूक होऊन हे राज्य "स्वराज्य" आहे हे सांगावच लागेल... नाहीतर या व्यवस्थेचे नकळत गुलाम राहून जगून मरूनही जातील कित्येक पिढ्या…

-JuniorWriter


Comments